हॉकी टीम कडून भारतीय जनतेला जल्लोष पुर्ण नजराणा
आशिया कप ची सुरुवात जशी झाली होती त्या वेळेसच असे वाटत होते कि भारत सगळ्या आव्हानांना अगदी पुरून उरणार आहे..ढाका मध्ये झालेल्या फायनल मॅच मध्ये भारताने मलेशिया ला २-१ ने पराजित केले आणि तिसऱ्यांदा ह्या किताबा वर आपले नाव लिहिले आहे..दहा वर्षा नंतर भारताने हा कप पुन्हा मिळवला आहे २००७ मध्ये चेन्नई मध्ये साऊथ कोरिया ला ७-२ ने हरवून आशिया कप जिंकला होता..ढाका त झालेल्या मॅच मध्ये रामनदीप सिंग ने पहिला गोल केला आणि ललित ने दुसरा गोल करून भारताला २-० ने बढत प्राप्त केली..हॉकी हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ असून ह्या मध्ये चॅम्पियनशीप म्हणजे देशाच्या प्रतिष्ठे चा प्रश्न असतो ..